adplus-dvertising

JaiHindi(ePustakalay)

Suras Va Chamatkarik Goshti (सुरस व चमत्कारिक गोष्टी)

सूरस आणि चमत्कारी गोष्टी – हे कृष्णा शास्त्री, विष्णू शास्त्री, हरी कृष्णा दामले यांचे पुस्तक आहे, हे पुस्तक हिंदी भाषेत लिहिलेले आहे. या पुस्तकाचे एकूण वजन 74 एमबी आहे आणि पृष्ठांची एकूण संख्या 586 आहे. आपण खाली दिलेल्या डाउनलोड बटणावर क्लिक करून हे पुस्तक डाउनलोड करू शकता. पुस्तके आमचे खरे मित्र आहेत. आपले ज्ञान वाढवण्याबरोबरच, आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रेरणा देते. आमच्या वेबसाइट जयहिंडीवर तुम्हाला पुष्कळ पुस्तके विनामूल्य मिळतील. आपण त्यांना विनामूल्य वाचून आपल्या ज्ञानात वाढ करा.

Writer (लेखक ) कृष्ण शास्त्री, विष्णु शास्त्री, हरि कृष्ण दामळे
Book Language ( पुस्तक की भाषा ) Hindi | हिंदी
Book Size (पुस्तक का साइज़ )
74 MB
Total Pages (कुल पृष्ठ) 161
Book Category (पुस्तक श्रेणी) मराठी पुस्तकें / Marathi Books

पुस्तक का एक अंश

एके दिवशी शाहरियाराने आपल्या मुख्य वजिरास आज्ञा केली की, ‘ सेनापतीची मुलगी मला बायको करण्याकरितां घेऊन यावी.’ वजिराने त्याप्रमाणे आणल्यावर पातशहाने दुसरे दिवशी सकाळी तिचा वध करण्याकरितां तिला वजिराच्या स्वाधीन केली. वजिरास पातशाहाचे असले हुकूम बजावण्याचे काम मुळीच पसंत नव्हते.परंतु बिचारा करतो काय ? त्याने धनी सांगेल तें डोळे झाकून करण्याचे काम पतकरलें होते; यामुळे ते सर्व हुकूम त्यास मान्य करावे लागत.

बायको म्हणून आणिली व तिचाही तिसरे दिवशी सकाळी वध केला. तिच्या पाठोपाठ त्याने एक सुखवस्तु गृहस्थाची कन्या आणिली.सारांश, त्या शहरांत नित्य नेमाने एका कन्येचें संध्याकाळी पातशहाशी लम होई व नित्य नेमाने सकाळी एका स्त्रीचा वध होई,असा क्रम चालला.! ___ या क्रूर कृत्याची बातमी चोहोकडे परसरल्यावर शहरांतील सर्व लोकांची पांचावर धारण बसली. जिकडे जावें तिकडे शोकाचा, रडण्याचा, स्वर ऐकू येऊ लागला. कोठे पहावें तो बाप कन्येषिती रडत बसला आहे; कोठे आई मुलगी मेल्याबद्दल विलाप करते आहे कोठे आपल्या मुलीवर पाळी येईल या धाकानें लोक सिमस्त |

बायकोचा दररोज शिरच्छेद करण्याचे काम मुख्य वजिराकडे होतें तें काम करणे त्यास फार नापसंत होते हे वर सांगितलेच आहे.त्या वजिरास दोन कन्या होत्या. एकीचें नांव शाहजादी,ही वडील होती. धाकटीचें नांव दिनारजादी होते. दुसरी फारच गुणी होती, परंतु पहिली जी शाहजादी, ही मोठी धीट व समयोचित भाषण करणारी अशी होती. तिच्या अंगी जी अक्कल व चातुर्य ही होती तसे गुण पुरुषांचेही ठिकाणी सापडणे कठीण. इतके असून तिचे अंगी दुसरे गुणही पुष्कळ व अलौकिक होते. तिने पुष्कळ ग्रंथ वाचले होते. तिची स्मृति फारच उत्तम असे;यामुळे तिने जे जे वाचलें होतें तें सर्व तिच्या ध्यानांत रहात असे.तिने अभ्यास करून वैद्यक,इतिहास व दुसरी शास्त्रे यांची माहिती करून घेतली होती; तसेंच गायन, वादन नृत्य, वगैरे कलांतही ती फारच प्रवीण होती. कविता करण्याच्या बाबतीत तर त्या वेळच्या मोठमोठ्या कानासुद्धा तिची बरोबरी करता येत नव्हती.

डाउनलोड सुरस व चमत्कारिक गोष्टी  
सुरस व चमत्कारिक गोष्टी ऑनलाइन पढ़े
पुस्तक घर मंगाये

Leave a Comment